टाटा मोटर्स चीनच्या चेरीशी सहकार्य करार करणार

देशातील मोठी वाहनकंपनी टाटा मोटर्स चीनमधील कार फर्म चेरी ऑटोशी सहकार्य करार करणार असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही कंपन्यांकडून टायअपचे संकेत दिले गेले असल्याचे समजते. या करारामुळे भारतात चेरीचे आगमन होण्यास व चीनमधील बाजारपेठ टाटांना खुली होण्यास मोठेच सहाय्य मिळणार आहे.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेला कांही काळ या दोन कंपन्यात बोलणी सुरू असून दीड वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने स्ट्रॅटीजीवर काम करताना चेरीचा कांही प्लॅटफॉर्म खरेदी करण्याविषयी चर्चा केली होती. चेरी क्यूक्यू अे १, एम १ मायक्रो सेडान व ए ३ ही कॉम्पॅक्ट कार चे प्लॅटफॉर्म भागभांडवल वाढीसाठी आणि कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी विकणार आहे. चेरीच्या पथकाने अनेकवेळा टाटा मोटर्सला भेटही दिली आहे असे समजते.

टाटामधील वरीष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्केटसाठी टाटा अनेक कंपन्यांचा कोलॅबोरेशनसाठी विचार करत असून चेरी त्यातील एक आहे. विशेष म्हणजे टाटाची सबसिडरी असलेल्या जग्वार लँड रव्हरने चेरीशी यापूर्वीच टायअप केला आहे.

Leave a Comment