सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू, श्री‍कांतची घौडदौड सुरू

सिंगापूर – सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत, साई प्रणित या युवा खेळाडूंनी दमदार खेळी केली आहे. त्यांनी दमदार खेळीच्याप जोरावर उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यांची आागमी काळात विजयी घौडदौड कायम राहिल्यादस सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पदक मिळेल असे वाटते.

सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आघाडीचे खेळाडू सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप या स्टार बॅडमिंटनपटूंना पहिल्यास फेरीतच पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यानंतर मात्र भारताच्या युवा खेळाडूनी महिला एकेरी व पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्याच सिंधूने तिची प्रतिस्पएर्धी शिजुका उचीदावर २१-१७, १७-२१, २१-१६ अशा तीन गेममध्ये पराभव केला. पुढील फेरीत सिंधूसमोर जागतिक क्रमवारीत तिसर्यां स्थानावर असलेल्या यीहॅन वँगचे आव्हान आहे.

दुसरीकडे भारताचा के. श्रीकांतने दहाव्या रँकिंगवरील व्हिएतनामच्या टिएन ग्युयेनचा १८-२१, २१-१५, २१-८ अशा फरकाने पराभव केला. दरम्यान, या स्पधेत भारताचे युवा खेळाडू ऍल्विन फ्रान्सिस व अरुण विष्णू तसेच अरुण विष्णू व अपर्णा बालन यांना दुहेरीत पराभव पत्कारावा लागला आहे.

Leave a Comment