विराट कोहलीचा हमशकल अहमद शहजाद

एकसारख्या दिसणार्‍या व्यक्ती एकतर जुळी भावंडे तरी असतात किवा एकमेकांच्या नात्यातील तरी असतात असे मानले जाते. मात्र जगात एकसारख्या दिसणार्‍या सात व्यक्ती असतात असाही एक समज दृढ आहे. भारतीय क्रिकेटटीमचा आधारवड विराट कोहली याचा हमशकल पाकिस्तानात असून तोही क्रिकेटपटूच आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या टी २० मध्ये हे दोघेही आपापल्या टीमकडून खेळले आहेत.

विराट आणि पाकचा अहमद शहजाद हे दोघेही फलंदाज आहेत. दोघांचीही फलंदाजीची पद्धतही सारखी आहे. विराट ३ नंबरवर येतो तर अहमद ओपनर आहे. टी२० मालिकेत अहमदने पाककडून खेळताना शतक झळकावले तर विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आणि त्याला मॅन ऑफ द सिरीज किताबही मिळाला.

केवळ विराटचाच हमशकल आहे असे नाही तर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, अमेश यादव, आशीष नेहरा या क्रिकेटपटूंचेही हमशकल जगात आहेत आणि वेळोवेळी त्यांचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत.

Leave a Comment