भारतात फेसबुक युजरची संख्या गेली १० कोटींवर

अमेरिकेनंतर भारतात फेसबुक या सोशल साईटच्या युजरची संख्या सर्वाधिक असून त्यांचे १० कोटी अॅक्टीव्ह युजर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दर महिन्याला भारतात १० कोटी युजर फेसबुक वापरतात आणि विशेष म्हणजे त्यापैकी ८ कोटी ४० लाख युजर मोबाईलवर फेसबुक अॅक्सेस करतात असे फेसबुकच्या भारत विस्तार मोबाईल भागीदार विभागाचे प्रमुख केव्हीन डिसुझा यांनी सांगितले.

डिसुझा म्हणाले की फेसबुकचे ध्येयच लोकांना शेअर करण्याची ताकद पुरविणे आणि जग अधिक खुले करून कनेक्ट करणे हेच आहे. फेसबुकने नुकतीच इंटरनेट डॉट ओआरजी ही जागतिक भागीदारी केली असून त्याद्वारे जगभरातील ५ अब्ज लोकांना एक्सेस पुरविणे साध्य होणार आहे. फेसबुकच्या या विचारसरणीची साम्य असलेले भागीदार फेसबुकला हवे आहेत असेही ते म्हणाले.

फेसबुकने भारतात त्यांचे पहिले कार्यालय २०१० साली हैदा्राबादेत उघडले. त्यानंतर अल्पावधीतच फेसबुक युजरची संख्या ८० लाखांवर गेली होती. आता ही १० कोटींचा टप्पा ओलांडून गेली आहे. आकडेवारीनुसार डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत फेसबुकचे जगात १.२३ अब्ज युजर आहेत.

Leave a Comment