आमचा संसार छान चाललाय् – सानिया मिर्झा

कराची – भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आपले वैवाहिक आयुष्य अडचणीत असल्याच्या बातम्यांचे खंडन केले असून आपण शोएब मलीक याच्यापासून तलाक घेतलेला नाही; आपला संसार छान चाललेला आहे; त्या संबंधात निर्माण झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत असे स्पष्ट केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शोएब मलीक आणि सानिया मिर्झा यांचे पटत नसल्याच्या काही बातम्या  वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. 

सानिया मिर्झाचे सासर सियालकोट येेथे आहे. ती आपल्या सासरी आल्यानंतर तिने पत्रकारांशी बोलताना हा खुलासा केला. आपण दोघेही धंदेवाईक खेळाडू आहोत आणि वेगवेगळ्या दोन देशातले आहोत. त्यामुळे संसारात थोडा तणाव निर्माण होण्याची नेहमीच शक्यता असते. परंतु आपण त्या तणावावर मात करण्यात यशस्वी झालो आहोत असे ती म्हणाली.

आपण सासरी आलो आहोत; पती आणि सासू-सासर्‍यांसोबत चार दिवस आनंदात रहात आहोत. यूरोपामध्ये होणार्‍या विविध स्पर्धांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी आपण इथे विश्रांती घेत आहोत. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर आहोत आणि असे दूर राहिले की शांत वाटते. मनसोक्तपणे खाणे आणि शॉपिंग करणे हे दोन छंद जोपासण्यात अशावेळी आनंद वाटतो असे ती म्हणाली.

Leave a Comment