भाजपवाल्याना नाव बदलण्याची सवय- आर. आर. पाटील

बीड- गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील प्रत्येक नेत्याला त्याची नाव बदलण्याची सवय लागली आहे. काही दिवसांपूवीच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी त्याचे नाव बदलून नमो असे केले आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे ही आता त्याचे नाव तर गोमु असे ठेवतील अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

बीड येथे राष्ट्र वादी कॉग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांच्याआ प्रचारार्थ आयोजीत करण्यानत आलेल्याी सभेत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना गृहमंत्री आर. आर. पाटील म्हनणाले, गेल्याा काही दिवसापासनू महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण हे भाजप करीत आहे. त्यामुळे या पक्षाला मतदारांनी त्यांची जागा दाख्वषली पाहिजे असे मत व्यक्त केले.

राज्यात जातीपातीचे राजकारण भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केले आहे. त्यामुळे राज्याातील राजकारणावर त्यांचा परिणाम होत आहे. मुंडे हे राजकारणातले नायक नाही तर खलनायक असल्याची परखड टीका आर. आर. पाटील यांनी यावेळी केली.