भारताचा हॉकी संघ युरोप दौ-यावर

नवी दिल्ली – आगामी काळात युरोपियन राष्ट्रांशी दोन हात करण्यासाठी भारताचा हॉकी संघ ९ एप्रिलपासून युरोप दौ-यावर जात आहे. ३१ मेपासून विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी हॉकी संघ या दौ-यात टीम नेदरलॅण्ड संघासह दोन, तर बेल्जियम संघासह एक सामना खेळवणार आहे.

भारताचा संघ हा नियोजीत दौरा १९ एप्रिल रोजी संपवून मायदेशी परतणार आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी व्यक्त केली. यंदाची विश्वचषक स्पर्धा या नेदरलॅण्डमध्ये होणार असल्याने खेळाचे पैलू ओळखताना आणखी मदत होणार आहे.या स्पर्धेसाठी गेल्या एक महिन्यापासून सराव करणा-या भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचेही बाल्टा म्हणाले.

डिफेंडर सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली होणा-या या दौ-यात २१ जणांचा समावेश आहे. युरोप दौ-यावर जाणारा संघ पुढीलप्रमाणे : पी. आर. श्रोजेशा, हरज्योत सिंग (गोलकिपर), डिफेंडर वीरेंद्र लाका, रुपिंदर पाल सिंग (उपकर्णधार), व्ही. आर. रघुनाथ, कोथाजित सिंग, गुरिंदर सिंग, गुरबाज सिंग, सरदार सिंग (कर्णधार), एस.के. उत्थप्पा, धर्मवीर सिंग, मनप्रीत सिंग, चिंग्लेनसाना सिंग, दानिश मुज्तबा, देविंदर वाल्मोनी, एस. व्ही. सुनील, नितीन शिमैय्या, अक्षरदीप सिंग, रमणदीप सिंग, युवराज वाल्मीकी, ललित उपाध्याय.

Leave a Comment