मोदी सरकार आल्यास मुंडे कृषीमंत्री- राजनाथ सिंह

बीड : केंद्रात आगामी काळात नरेंद्र मोदींचे सरकार येणार हे काळया दगडावरची रेष आहे. आगामी काळात जर केद्रांत मोदी यांचे सरकार आल्यास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे हे देशाचे कृषीमंत्री होतील अशी घोषणा खुद़द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली आहे. परळीमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या प्रचारासाठी राजनाथ सिंहांची सभा आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी ही घोषणा केली.

यावेळी पुढे बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह म्हणाले, आगामी काळात गोपीनाथ मुंडे हे कृषीमंत्री होतील याची धास्ती शरद पवार यांनी घेतली आहे. त्यागमुळेच ते वैफल्य ग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून ते सभेत मोदी व मुंडे यांच्यावर टीका करीत आहेत. त्याकडे कोणी लक्ष देवू नये असे आव्हन त्यांनी यावेळी केले.

दहा वर्षापूवीच्या एनडीए सरकारच्या काळात राजनाथ सिंह स्वतः कृषीमंत्री होते. त्यामुळे आगामी काळात सत्ता आली तर मुंडेंना नेमके कुठलं मंत्रिपद मिळणार यावर चर्चा सुरु होती. स्वत: गोपीनाथ मुंडे यांनीही यापूर्वी आपल्याला कृषीमंत्री व्हायचे म्हटले होते. त्यानंतर परळी येथील सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मुंडे कृषीमंत्री होतील असे सांगून टाकले आहे.