विजयामुळे लसिथ मलिंगाचे नशिब उजळले

मीरपूर – कोणचे नशीब कधी उजळेल हे काहीच सांगता येत नाही. तशीच अवस्था श्रीलंकेचा प्रभारी कर्णधार लसिथ मलिंगा याची झाली आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांडीमल निलंबित झाल्याने मलिंगाला प्रभारी कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यापूर्वी तो संघाचा उपकर्णधार होता. प्रभारी कर्णधाराची भूमिका पार पाडत असताना मलिंगाच्याव नेतत्वाखालील श्रीलंकेने रविवारच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा पराभव केला. त्यामुळे आता मलिंगा हा वर्ल्डकप विजेता कर्णधार बनला आहे. त्यामुळे त्याचे नशीब चांगलेच उजळले आहे.

याबाबत बोलताना श्रीलं‍केचा कर्णधार लसिथ मलिंगा म्हणाला, टीम इंडियावर मिळवलेला हा विजय संघातील दोन महान खेळाडू महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना समर्पित केला आहे. या दोघांनी या वर्ल्डकपनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हा संगा आणि महेलाचा फेयरवेल सामना होता. या दोन्ही खेळाडूंसाठी आपणाला हा सामना जिंकायचा आहे, असे आम्ही सर्वांनी ठरवले होते. हे दोघेही जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. या दोघांसोबत खेळण्याची संधी मिळाली, हे आम्ही आमचे नशीब समजतो. त्यारमुळे फायनलमधील हा विजय या दोघांच्या नावे आहे.’

टीम इंडियाला नमवून आयसीसीचा वर्ल्डकप जिंकणा-या श्रीलंकेच्या‍ संघाचे ख-या अर्थाने नशीब उजळले आहे. या विजयामुळे त्यांकना बोनस जवळपास ९ कोटी रुपयांची भेट मिळाली आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाने हे बक्षीस जाहीर केले आहे. लंकेने उपांत्यसामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडीजचा आणि नंतर फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केल्याने मंडळाकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. एकंदरीत आगामी काळात मिळणा-या बक्षीसामुळे आता मलिंगाचे नशीब उजळणार आहे.

Leave a Comment