इस्लामाबाद – सॅमसंग त्यांच्या लेटेस्ट स्मार्टफोन गॅलॅक्सी एस फाइव्हला सुरक्षा फिचर्स देणार असल्याचे वृत्त आहे. जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या सॅमसंगने स्मार्टफोन चोरीच्या घटना गंभीरपणे घेतल्या असल्याने ही उपाययोजना केली जात असल्याचे समजते.
युजरना सॅमसंग देत असलेले फाइंड माय मोबाईल व रिअॅक्टीव्हेशन लॉक हे दोन्ही सुरक्षा फिचर्स मोफत डाऊनलोड करून घेता येणार आहेत. यामुळे फोन चोर्यांना अटकाव होईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. चोरी प्रतिबंध करणारे हे फिचर्स देण्यामागे सॅन फ्रान्सिस्को डिस्ट्रीक्ट अॅटर्नी जॉर्ज गॅस्कॉन, न्यू यॉर्क डिस्ट्रीक्ट अॅटर्नी एरिक शिडरमन व अन्य लॉ अधिकार्यांनी स्मार्टफोन उत्पादकांनी फोन चोर्या रोखण्यासाठी किल स्विचेस दिले पाहिजेत अशी केलेली मागणी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.