राज यांच्याकडून पुन्हा गुजरातचेच कौतुक

नाशिक – नरेंद्र मोदींना पाठींबा कुणावर कुरघोडी करण्यासाठी नाही, तर ते गुजरातला आपलं समजून काम करतात अशी गुजरातच्या विकासावर स्तुतीसुमनं उधळत मोदी पंतप्रधान झालेच पाहिजेत असे पुन्हा सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला कुणाचा मुखवटे घालून फिरायची गरज नाही अशी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. येथील मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, फक्त मत मिळवण्यासाठी मी काम करत नाही. 

माझ्याकडे जादूची कांडी नाही, पण बदल करण्याची मला इच्छा आहे. काही कामं जनतेनेही आपली समजून केली पाहिजेत. सध्या राज्यकर्त्यांचा अधिकाऱ्यांवर धाक नाही, तो असायला पाहिजे असे सांगत राज्यकर्त्यांच्या जाणीवा जागृत झाल्या असाव्यात असे राज यांनी सांगितले. पोलिसांवर टीका करताना राज म्हणाले, लोकांच्या संरक्षणासाठी पोलिस नाहीत, तर टोलच्या संरक्षणासाठी ते आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांची नक्कल केली.