पाऊस आल्यास टीम इंडिया फायनलमध्ये

मीरपूर : बांगलादेशमध्ये होत असलेल्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत शुक्रवारी टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सेमीफायनलची झुंज रंगणार आहे. हवामान खात्याने शुक्रवारीही जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर साखळी स्पर्धेतील सर्व सामने जिंकल्याने टीम इंडियाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

या फायनलच्या सामन्यात पावसामुळे किमान पाच षटकांचाही खेळ झाला नाही, तर साखळी फेरीत आपापल्या गटातील गुणतक्त्यात ज्या संघाचे स्थान सर्वोच्च असेल त्याला सेमीफायनल मध्ये विजयी घोषीत करण्यात येणार आहे. यामुळे या सामन्यात टीम इंडियाचे पारडे थोडेसे जड आहे.

टीम इंडियाने गट २ मध्ये सर्वच्या सर्व म्हणजेच चार सामने जिंकून अग्रस्थानी आहे, तर दक्षिण आफ्रिका संघ गट १ मध्ये दुस-या स्थानावर आहे. त्यामुळे शुक्रवारी पाऊस झाला आणि सामना झाला नाही तर टीम इंडियाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे.

Leave a Comment