नोकियाने सादर केले ३ नवे ल्युमिया स्मार्टफोन

मायक्रोसॉफ्टच्या बिल्ड २०१४ या परिषदेत नोकियाने ३ नवीन ल्युमिया स्मार्टफोन सादर केले आहेत. ल्युमिया ६३०, ६३५ व ल्युमिया ९३० या नावाने हे फोन बाजारात आणले जात असून या फोननी इंटरनेटवर यापूर्वीच हंगामा माजविला असल्याचे सांगितले जात आहे.

ल्युमिया ९३० हा २० मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन मेटालिक लुकमध्ये सादर झाला आहे. ५ इंची स्क्रीन,३२ जीबी मेमरी,७ जीबी क्लाउड स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगही करता येणार आहे. जूनमध्ये अनेक देशात लाँच होणार्‍या या फोनची किंमत आहे ५९९ डॉलर्स. केशरी, चमकता हिरवा,काळा पांढरा या रंगात तो उपलब्ध आहे. अमेरिकेत हा फोन ल्युमिया आयकॉनशी स्पर्धा करेल.

ल्युमिया ६३० व ६३५ हे कमी किमतीतले स्मार्टफोन दिसण्यात जवळजवळ सारखेच आहेत. ६३० साठी थ्रीजी तर ६३५ साठी फोरजी कनेक्शन असून या फोनच्या किमती अनुक्रमे १५९ डॉलर्स (सिगल सिम) ,१६९ डॉलर्स -ड्युअल सिम तर ६३५ साठी १८९ डॉलर्स अशा आहेत. ६३० मे पर्यंत आशिया, रशिया व युरोप बाजारात येत आहे तर ६३५ अमेरिकेसह सर्व देशांत जुलैमध्ये येईल असे समजते.

Leave a Comment