
मेक्सिको – सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकवर आपला नग्न फोटो अपलोड केला हे पाहताच अँन्ड्री ऍलीझाबेथ गुटीरेझ (16) हिने तिची समवयस्क मैत्रीण अॅनल बेझची चाकूने 65 वेळा भोसकून हत्या केली. अॅनलची हत्या करण्यापूर्वी अॅलीझाबेथने तिला ट्विटरच्या माध्यमातून एक मॅसेज केला होता. ‘मी खुप शांत स्वभावाची आहे. परंतु, आतापर्यंत आभासी विचारांमध्ये मी तुझा दोन-तीन वेळा खून केला आहे. या मॅसेजमुळे या हत्येचे धागेदोरे पोलिसांना मिळाले.
