स्पॉट फिक्सिंगप्रकरणी १२ ते १३ खेळाडूंवर ठपका

नवी दिल्ली: आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणाची चौकशी अजूनही सुरूच आहे. या चौकशी दरम्यालन आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मुदगल समितीने गोपनीय अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये आणखी तीन संघांच्या १२ ते १३ खेळाडूंवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी १२ ते १३ खेळाडूंवर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या प्रकरणी या आधी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंची तसंच त्यांच्या मालकांची या प्रकरणी चौकशी झाली आहे. त्यातील ६ जणांना दोषीही ठरवण्यात आले आहे. त्यामुळे गोपनीय अहवालात नावे असणा-यानाही आता कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्या मुळे आता आगामी काळात कोणाकोणांवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याचा सादर करण्यात आलेल्या या गोपनीय अहवालामुळे फिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंची संख्या आता १८ वर पोहोचली आहे तर संघांची संख्या ५ झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या ८ संघापैकी ५ संघांवर फिक्सिंगचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या मुळे आता या सर्वांवर कारवाई करण्याची गरज असल्याची चर्चा सुरू आहे.