युवराज सिंगला सरावाच्यावेळी दुखापत

ढाका- टीम इंडियाच्या सरावाच्या वेळी फुटबॉल खेळताना झालेल्या दुखापतीमुळे डावखुरा फलंदाज युवराज सिंगला बुधवारी सकाळनंतर सरावाला मुकावे लागले. मंगळवारी फुटबॉल खेळत असताना युवराजच्या डाव्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नाही तरीपण डॉक्टजरांनी त्याोला काळजी घेण्यााच्याख सूचना दिल्याळ आहेत.

मंगळवारी सरा करीत असतान युवराजच्या डाव्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली असल्याने काळजी घेण्यासाठी त्याला बुधवारी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे असे संघाचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा यांनी सांगितले. आगामी काळात होत असलेल्याट सामन्याबत युवराजला खेळता येईल असेही त्यांयनी यावेळी बोलताना स्पेष्टअ केले.

२००६ साली चॅम्पियन्स करंडकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान खो-खो खेळताना युवराजच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्याला बरेच महिने क्रिकेटपासून वंचित राहावे लागले होते.

Leave a Comment