मोदी पंतप्रधान झाल्यास चिंता वाढेल, मुस्लिमांमध्ये भीती’

नवी दिल्ली – पाकिस्तानी दैनिक ‘डॉन’ने नरेंद्र मोदी यांचे नाव अयोद्धेत  राम मंदिराच्या नावावर झालेल्या दंगलीशी जोडले आहे. ‘डॉन’ने अयोद्धेतून दिल्या गेलेल्या वृत्तानुसार,’मोदींएवजी कोणीही पंतप्रधान झालेला चालेल. अशी भारतीय मुस्लिमांची इच्छा असल्याचे म्हटले आहे.’  मोदी पंतप्रधान झाले तर परिस्थिती चिंताजनक होईल अशी भीती मुस्लिमांमध्ये आहे. 

अ‍ॅडम प्लोराइट आणि  अ‍ॅनि बनर्जी यांच्या रिपोर्टनुसार गुजरातमध्ये 2002 ला झालेल्या दंगलीमुळे अयोद्धा प्रकरणानंतर झालेल्या धार्मिक हिंसाचारात मोदींची भूमिका नजरेआड करण्यात आली. मात्र, राम मंदिरासाठी अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेची व्यवस्था करणारे दुसरे तिसरे कोणी नसून मोदीच होते.  अधिकाधिक मुस्लिमांसोबत चर्चा करुन तयार करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये एएफपी या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने विश्व हिंदू परिषदेचे शरद वर्मा यांचे एक वक्तव्य देण्यात आले आहे. त्यात शर्मा म्हणतात, ‘जर हिंदू पक्षाला बहुमत मिळाले तर आम्ही संसदेत कायदा पास करुन राम जन्मभूमी हिंदूच्या स्वाधिन करण्याची मागणी करु.

‘ मोदी उत्तरप्रदेशातील वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. येथे जवळपास तीन लाख मतदार मुस्लिम आहेत. ही संख्या निवडणुकीचा निकाल ठरविण्यास पुरेशी आहे. मात्र, येथून निवडणूक लढवत असलेले आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे कैलाश चौरसिया यांचे मत आहे, की त्यांना हिंदूसह मुस्लिमांचीही मते मिळतील. मुस्लिमांना काँग्रेस आपला परंपरागत मतदार मानते. बहुजन समाज पक्षाची भिस्त दलित आणि मुस्लिमांवरच असते. या सर्वांच्या निवडणूक समीकरणाला छेद देण्यासाठी कौमी एकता दलाचे आमदार मुख्तार अन्सारी देखील निवडणूक मैदानात उतरले आहेत. वाराणसीत ब्राम्हण मतदार 2.5 लाख आहे, तर पटेल आणि वैश्य दोन – दोन लाख आहे. यादवांची संख्या एक लाखांच्या आसपास आहे. 

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदावर नरेंद्र मोदींनाही मुस्लिम मतांची काळजी आहे. गुजरातमधील मुस्लिमांना आपलेसे करण्यासाठी ते त्यांचे खास दुत पाठवत आहे. भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना देशभरातील मुस्लिमांना भाजपकडे वळवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याच्या योजनेच नेतृत्व जफर सरेशवाला यांच्याकडे आहे.

Leave a Comment