
नवी दिल्ली- कोणत्याही बॅंकेतील खातेदाराच्या खात्यावरील किमान रक्कम कमी झाली तरी यापुढे दंड आकारू नये, असे निर्देश भारतीय रिझर्व बॅंकेने (आरबीआय) इतर बॅंकांना दिले आहेत. देशातील विविध बॅंकांमध्ये कोट्यवधी खातेदारांची बचत खाती आहेत. ग्राहकांना आपल्या खात्यावर किमान रक्कम ठेवावी लागते. मात्र, त्यापेक्षा रक्कम काढली गेल्यास दंड आकाराला जातो. परंतु, यापुढे बॅंकांनी दंड आकारू नयेत, असे ‘आरबीआय’ने म्हटले आहे.
