नाराज बाबर सेनेला जय महाराष्ट्र करून मनसेत

 मावळ लोकसभा मतदारसंघात गेली पाच वर्षे खासदार म्हणून चांगले काम करूनही शिवसेनेने गजानन बाबर यांना तिकीट नाकारून मोठी बक्षिस दिले. इतकी वर्षे ज्या संघटनेत घामगाळून काम केले त्याच संघटनेने दिलेल्या बक्षिसाने नाराज झालेल्या बाबर यांनी अखेर सेनेला जय महाराष्ट्र केलाच आणि ते लवकरच मनसेत दाखल होतील.

माजी खासदार गजानन बाबर यांना तिकीट नाकारल्यावर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काही सरदारांना पाठवले होते. पण तुम्ही तिकडे सेना वाढवत असताना मी इकडे तेच काम करत होतो त्यामुळे सेनेत आपण दोघेही बरोबरचे आहोत असे सांगत बाबर यांनी त्यांना परत पाठवले.

नगरसेवक, दोनवेळा आमदार, एकदा खासदार अशी मोठी कारकिर्द गजानन बाबर यांची राहिली आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. त्यामुळेच ते आजही मुलाखत देताना मी कधी कुणाला पैसे देत नाही कधी कुणाचे कशाबद्दल पैसे घेत नाहीत असे जाहीरपणे सांगण्याचे धाडस बाबरच दाखवू शकतात.बाबर यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्याचा फटका सेनेच्या उमेदवाराला बसू शकतो. तो किती बसू शकतो हे मतदानंतरच कळेल. 

 

Leave a Comment