खंजिर खुपसणारा माझ्याशी काय बोलणार? – उद्धव ठाकरे

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजिर खुपसणारा माझ्याशी काय बोलणार? मला कंटाळून ज्याने शिवसेना सोडली, तो माझ्या फोनची वाट कशाला बघतो, असे सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. असल्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नसल्यामुळे आपण आता या चर्चेला पूर्णविराम देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.  

शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचार मेळाव्यात बोलताना उद्धव यांनी राज ठाकरे यांनी काल पुण्यात त्यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मी कोणाकडे भिक मागण्यासाठी गेलेलो नाही आणि मागणारही नाही. आम्ही एक भूखंड जरी विकला असेल, तर मी राजकारणातून निवृत्त होईन. बिल्डर कोण आहे ते जनतेला ठाऊकच आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment