शिवसेनेत परतणार नाही- नारायण राणे

मुंबई – काही दिवसांपूर्वी एका चॅनेलवर झालेल्या मुलाखतीत नारायण राणे यांनी माझी शिवसेनेत जायची तयार आहे. मात्र, सेनेच्याे नेत्यांना चालेल का असा प्रश्नव उपस्थित केला होता. त्याआमुळे त्या्वेळेस पासून नारायण राणे यांच्यां शिवसेना प्रवेशाच्यास जोरदार बातम्यात येत होत्याे. मात्र शिवसेना सोडून आपल्याला नऊ वर्षे झाली. आज आपण काँग्रेसमध्ये सुखी आहोत असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

मालवण तालुक्याचे शिवसेना संपर्कप्रमुख संतोष आचरेकर तसेच उपजिल्हाप्रमुख संजय लुडबे यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी दलित पँथरचे नेते गंगाधर गाडे यांनीही राष्ट्रवादीची साथ सोडत काँग्रेसचा हात पकडला. या वेळी राणे यांनी आपले मन मोकळे केले.

अलीकडे एका मुलाखतीत राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा उद्धवजी असा उल्लेख केला होता. तो धागा पकडून उद्धव यांनी राणे यांनी त्यांचे मन मोकळे करण्याचे आवाहन केले होते. याविषयी विचारले असता राणे म्हणाले, आपली भूमिका माणुसकीची होती. आपले मन मोकळे आहे. गेल्या नऊ वर्षांत शिवसेनेबद्दल प्रेम राहिलेले नाही. सवयीनुसार नावापुढे ‘जी’ लावल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्याविषयी ओलावा वाटला असेल. मात्र आपल्याला शिवसेनेत परतण्याचा संदेश द्यायचा नव्हता, तर तो माणुसकीचा धर्म होता, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिले. त्यांच्या या उत्तराने मात्र राणे शिवसेनेत जाणार या चर्चेना पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Comment