फेसबुकच्या बनावट अकाऊंट्सवर वॉच

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. या निवडणूकीत मोठया प्रमाणात तरुण मतदार मतदान करणार आहेत. सध्याो तरुण मतदारांना सोशल नेटवर्किंग साइटचे जणू काही व्यसनच लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सोशल साइटचा वापर मुक्तणपणे प्रचारासाठी करुन तरुण मतदारांचं लक्ष वेधू घेतायेत. त्यामुळेच आगामी काळात फेसबुकच्या बनावट अकाऊंट्सवर वॉच ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकसारख्या सोशल साइटवर बनावट प्रोफाईल्स बनवून राजकीय पक्षांचे ‘लाइक्स’ आणि ’फॉलोअर्स’ ची संख्या वाढत असल्यामचे निर्दश्नामस आले आहे. त्यामुळे फेसबुकने अशा गैरप्रकारावर कारवाई करण्यास चालू केला आहे. तसेच बनावट अकाऊंट्स ऑटोमेटेड आणि मॅन्युअल यंत्रणेचा वापर करुन बंद केली जात आहेत. त्याकमुळे आगामी काळात अशा प्रकारावर आळा घालण्या्त येणार आहे.

फेसबूक कडून दक्षता घेता येत असल्यााने एखादे अकाऊंट बनवणे, रजिस्टर करणे, फ्रेंड्स बनवणे, मॅसेज पाठवणे अशावेळी बनावट अकाऊंट ओळखता येतात. तसेच बनावट अकाऊंट पडताळण्यासाठी फेसबुककडे मशीन यंत्रणा असल्याचे फेसबुक अधिका-यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आगामी काळात फेसबुकमुळे राजकीय पक्षही अधिकच सक्रिय झाले आहेत.

Leave a Comment