सांगलीत दोन पाटलांची झुंज

सांगली जिल्हा हा स्व. वसंतदादांचा जिल्हा. सहकारी चळवळीचा जिल्हा म्हणून परिचित आहे. या जिल्ह्याचा कौल कामच वसंतदादा यांच्या बाजूने राहिला आहे. त्यांच्या पश्चात दादांच्या घराण्याच्या मागे विशेष जिल्हा उभा असल्याचे चित्र आजपर्यंत आहे. यावेळी मात्र भाजपने संजय पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी देऊन प्रतिक पाटील यांना आव्हान दिले आहे.

सांगली जिल्ह्यातून भाजपचे तीन आमदार आले आहेत. त्यामुळे यावेळी भाजपला जास्त आशा वाटत आहे. त्यात संजय पाटील यांनी मागच्या दोन विधानसभा अपक्ष लढवून निवडणुका जिंकता जिंकता हरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे किती जनशक्ती आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. या वेळी भाजप सेना आरपीआय महायुतीची ताकद त्यांच्या मागे आहे.

सांगलीचे आमदार संभाजी पाटील जरी नाराज असले तरी गोपीनाथ मुंडे हे त्यांची नाराजी दूर करू शकतात. त्यामुळे यावेळी सांगली जिल्ह्यात प्रथमच काँग्रेस विरूद्ध भाजप असा तुल्यबळ सामना रंगत आहे. या दोन संजय पाटील आणि प्रतिक पाटील या दोन पाटलातील झुंज एकंदरीतच लक्षवेधक असेल.

Leave a Comment