युवराज सिंगला सूर गवसला

मीरपूर – बांगलादेशमधील टी २० क्रिकेट कपमध्ये टीम इंडियाने सलग चार सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या तीन सामन्यात युवराजसिंगला एकाही सामन्यात दमदार कामगिरी करता आले नाही. त्यामुळे युवराजच्या फार्मविषयी चिंता व्यक्त केली जात असताना रविवारी ऑस्ट्रलियाविरूध्द दमदार कामगिरी करीत चार उत्तुंग षटकाराच्या मदतीने युवराज पुन्हा फर्मात आला आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस बोलावले. युवराजने या सामन्याात तीन षटकार व चार चौकारांच्याा मदतीने तडाखेबाज अर्धशतक पूर्ण केले. त्यास सामन्याकत त्यांन ६० धावा केल्या. टीम इंडियाच्या डावाचा शिल्पकार युवराजसिंग ठरला. युवीनेच सामना गाजवला. युवी वगळता रोहित शर्मा (५), सुरेश रैना (६), रवींद्र जडेजा (३) यांना या वेळी अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. रहाणेने १९, कोहलीने २३, तर कर्णधार धोनीने २४ धावांचे योगदान दिले.

धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. त्यांचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. टीम इंढियाचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन (४/११) आणि अमित मिर्शा (२/१३) यांच्या दमदार फिरकीच्या बळावर भारताने वर्ल्डकप टी-२० तील ग्रुप दोन मध्ये अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला केवळ ७३ धावांनी हरवले. धोनी ब्रिगेडला दुस-या उपांत्य सामन्यात शुक्रवारी ४ एप्रिल रोजी अ गटात दुसरे स्थान मिळवणा-या संघासोबत खेळायचे आहे.

Leave a Comment