मोदींवर आले बाल नरेंद्र कॉमिक

भाजपने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उठावदार करण्याची एकही संधी न सोडण्याचा संकल्प सोडला आहे. मोदी देशातील जनतेच्या समोर सतत राहावेत यासाठी त्यांच्या नावाच्या घोषणा, पोस्टर, टी शर्ट, कुडते, मोबाईल, व्हीडिओ गेम्स बाजारात आणले गेले आहेत. त्यात आता बाल नर्रेंद्र या कॉमिक बुकची भर पडली आहे. हे कॉमिक बुक बाजारात दाखल झाले आहे.

रानडे प्रकाशन आणि ब्ल्यू स्नेल अनिमेशनने तयार केलेल्या या कॉमिकमध्ये मोदींच्या बालपणातील बहुतेक सर्व घटना कथारूपाने सादर करण्यात आल्या आहेत. त्यात मोदींचे बालपणापासूनचे धैर्य, साहस, परोपकारी वृत्ती, दुसर्‍यांना मदत करण्याची तयारी यावर भर दिला गेला आहे. सध्या हे कॉमिक इंग्रजीत असले तरी ते लवकरच हिंदी, गुजराथी व अन्य भाषात तयार केले जाणार आहे.

मोदी स्वतःला चायवाला का म्हणतात याचा खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे.१९६२ सालच्या युद्दात रेल्वेतून जाणार्‍या सैनिकांना मोदी चहा व जेवण देत असत. पाण्यात बुडणार्‍या मुलाला वाचविणारा बाल नरेंद्र, मगरी असलेल्या तलावात चेंडू काढणारा, शाळेत बदमाश मुलांना धडा शिकविणारा, शाळेच्या बांधकामासाठी वर्गणी गोळा करणारा, जाळ्यात अडकलेल्या चिमणीची सुटका करणारा, आईसाठी आयुर्वेदिक औषधे कुटणारा, थिएटरमध्ये अभिनय करणारा, शिक्षकांचा आवडता, गावाच्या विकासासाठी सतत विचार करणारा, सहा जणांच्या कुटुंबासह एकाच खोलीत राहणारा बाल नरेंद्र या कॉमिकमधून भेटणार आहे.

Leave a Comment