न्यूयॉर्क- भारतीय वंशाच्या १४ वर्षांच्या सुबीर मिरचंदानी या मुलाने तयार केलेल्या अनोख्या योजनेमुळे अमेरिकन सरकारचे वर्षाला ४० कोटी डॉलर्स वाचू शकणार आहेत. त्यासाठी अमेरिकन सरकारला त्याच्या सरकारी दस्तऐवजाच्या लिपित थोडा बदल करावा लागणार आहे.

सीएनएन कडून आलेल्या अहवालानुसार सुबीर पिटसबर्ग मधील शाळेत सध्या शिकतो आहे. त्याने तयार केलेल्या गॅरोमोड लिपीमुळे ही बचत होते. ही लिपी अमेरिकन सरकारने वापरली तर दरवर्षी १३.६ कोटी डॉलर्सची बचत होणार आहे व प्रांतीय सरकारांनीही ही लिपी स्वीकारली तर आणखी २३.४ कोटी डॉलर्सची बचत होऊ शकणार आहे. सुबीर ला शाळेत करावयाच्या प्रोजेक्टसाठी त्याने पैसे कसे वाचविता येतील व नुकसान कसे कमी करता येईल यावरच मुख्य भर दिला होता. त्यातून त्याने ही योजना तयार केली असून त्याचा हा उपक्रम जर्नल फॉर इमर्जिंग इन्व्हेस्टीगेटर्स मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.