निवडणुकीनंतर काँग्रेस होणार नामशेष: अडवाणी

औरंगाबाद – वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येईल; असा दावा करतानाच पक्षाचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनी; काँग्रेसला खासदारांच्या संख्येची शंभरीही ओलांडता न आल्याने हा पक्ष नामशेष होईल; असे भाकीतही वर्तविले आहे.

भाजपचे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पक्षकार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस आघाडीच्या एक दशकाच्या कार्यकाळात महागाईने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले. त्याचप्रमाणे या काळात अनेक घोटाळे आनि भ्रष्टाचाराची प्रकरणे घडली. काँग्रेसच्या अनेक उमेदवारांचा घोटाळ्यात सहभाग असल्याने काँग्रेसला शंभर खासदारही निवडून आणता येणे अशक्य आहे. त्यामुळे हा पक्ष निवडणुकीनंतर अस्ताला जाईल; असेही अडवाणी यावेळी म्हणाले.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचेही अडवाणी यांनी कौतुक केले. गुजरातमध्ये मोदींनी मोठ्याप्रमाणावर विकास घडवून आणला असून गुजरातचा विकास हा इतर राज्यांसाठी आदर्शवत आहे; असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीला रिपब्लिकन पक्ष (ए), स

Leave a Comment