विश्वनाथन आनंदने पटकावले चेस टुर्नामेंटचं विजेतेपद

मॉस्को: गेल्याक काही दिवसांपासून पराभव सहन कराव्या लागत असलेल्याक भारताच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने त्यांच्याा लौकिकास साजेशी खेळी केली आहे. त्याच्या या खेळीने त्यांनी सर्व टीकाकाराना उत्तर दिले आहे. तेराव्या फेरीत रशियाच्या सर्जेई कार्जाकिन याला बरोबरीत रोखत कॅंडिडेट्स चेस टुर्नामेंटचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच्या या विजयामुळे विश्वनाथन आनंद पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर परतला आहे.

कॅंडिडेट्स चेस टुर्नामेंटमध्येा विश्वेनाथ्‍ आनंद आणि कर्जाकिन यांच्यातील लढत सुमारे साडे पाच तासांहून अधिक वेळ सुरु होती. या ड्रॉसह आनंदच्या खात्यात आठ गुण जमा झाले आहेत. स्पर्धेत अनेक उलटफेर झाले. अव्वल मानांकित आर्मेनियाचा लेवोन आरोनियन याला रशियाच्या दीमित्री आंद्रेकिन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आणि याचा फायदा भारताच्या विश्वनाथ आनंदला मिळाला.

या सामन्यातील विजयामुळे आनंदच्या खात्यात आठ गुण आहेत. कर्जाकिन, क्रॅमनिक, मामेदयारोव्ह, आंद्रेकिन आणि आरोनियन ६.५ गुणांसह संयुक्तरित्या दुस-या स्थानावर आहेत. तर पीटर स्विडलर सहा गुणांसह तिस-या स्थानावर आणि टोपालोव्हचे ५.५ अंक असून तो शेवटच्या स्थानावर आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी उद्या खेळवली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात निकाल काहीही येवो आनंदने ही स्पर्धा आताच जिंकली आहे.

Leave a Comment