प्रजोत्पादनावर रसायनांचे परिणाम

विविध कारखान्यांतून वापरली जाणारी आणि वापरून गटारात सोडली जाणारी रसायने आरोग्याला अनेक प्रकारे बाधक असल्याचे आजपर्यंत सांगण्यात आलेले आहेच. पित्त, हृदयविकार आणि विशेष करून कर्करोग इत्यादी विकार या रसायनां मुळे बळावतात असे आजपर्यंत आढळले आहे. परंतु अमेरिकेमध्ये फ्लोरिडा येथील माऊंट सैनी स्कूल ऑङ्ग मेडिसीन या वैद्यकीय संस्थेमध्ये या रसायनांचे प्रजोत्पादन संस्थेवर होणारे परिणाम विशेषत्वाने अभ्यासण्यात आले आहेत आणि त्यानुसार काही रसायनांचा या संस्थेवर अतीशय विपरीत असा परिणाम होत असतो, असे दिसून आले आहे. एका रसायनामुळे तर फ्लोरिडा लेक या तलावातील बेडकांमध्ये लिंगबदल झाला असल्याचे दिसून आले आहे. या बेडकांपैकी नर बेडकांचे रुपांतर बेडक्यांमध्ये झाले आणि त्यांनी अंडी सुद्धा घातली. असाच परिणाम माणसांवर सुद्धा होऊ शकतो, असा दावा या संस्थेतील संशोधक ङ्गिलीप लॅन्डरिगन यांनी केला आहे. 

अशा परिणामांमुळेच पुरुषाची प्रजनन क्षमता घटत असावी, असे लॅन्डरिगन यांचे मत आहे. या परिणामाला त्यांनी एन्डोक्राईम डिसरप्शन असे नाव दिलेले आहे. आपल्या सभोवतालच्या प्रदूषणामध्ये हा परिणाम करणारे अनेक घटक आहेत असे त्यांनी दाखवून दिले आहे. आपण बाजारातून काही वस्तू आणताना त्यांचे पॅकिंग प्लॅस्टिकच्या साह्याने करून आणतो, परंतु या प्लॅस्टिकमध्ये असे काही घटक आहेत की, ज्यांचा परिणाम या प्लॅस्टिकचा वापर करणार्‍यांपेक्षा त्यांच्या पुढच्या पिढीवर होत असतो. आईचे दूध सर्वात निर्दोष आणि प्रदूषणरहित असल्याचा दावा डॉक्टर करत असतात. परंतु डबाबंद खाद्य पदार्थ खाण्याची सवय असलेल्या महिलांच्या दुधात सुद्धा दोष निर्माण होऊ शकतो, असे दावा लॅन्डरिगन यांनी केला आहे. 

अमेरिकेत तर अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. एंडोक्राईन सोसायटी ऑङ्ग अमेरिका अशी संघटनाही स्थापन झाली आहे. सध्या सार्‍या जगामध्येच महिलांच्या प्रजनन क्षमतेत वाढ करण्यासाठी काही वनस्पतींचा वापर होत आहे. परंतु त्यामुळे या महिलांची प्रजनन क्षमता तात्पुरती वाढते आणि तिच्या जनन यंत्रणेमध्ये असे काही दूर पल्ल्याचे बदल होतात की, तिच्या स्त्रीविषयक हार्मोन्सचा समतोल नष्ट होतो. शास्त्रज्ञांच्या मते महिलांच्या हार्मोन्समधला समतोल थोडा जरी बिघडला तरी त्याचे ङ्गार गंभीर परिणाम तिच्या वागण्यावर होत असतात. त्यामुळे हार्मोन्सचा अभ्यास करणार्‍या काही तज्ज्ञांनी महिलांच्या हार्मोन्सचा समतोल बिघडवणार्‍या रसायनांचा प्रादुर्भाव होईल अशा रसायनांवर ताबडतोबीने बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. पीएङ्गओए या नावाचे एक औषध महिलांना दिले असता त्यांना होणारी मुले अधिक वजनाची होतात, असेही आढळले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment