
नवी दिल्ली – आयपीएलमधील सट्टेबाजी प्रकरणात नाव आल्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. .एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, धोनीचे सट्टेबाजी प्रकरणात नाव आल्यानंतर त्याने नाराजी व्यक्त करत चेन्नईचे कर्णधारपद व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंटस कंपनीचे उपाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकरणात नाव आल्याने आपली प्रतिमा खराब झाल्याचे धोनीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने शुक्रवारी श्रीनिवासन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
