टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया आमने-सामने

ढाका- बांगलादेशमधील टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन विजय मिळवीत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. रविवारी टीम इंडियाची लढत ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. साखळी फेरीतली टीम इंडियाची ही शेवटची लढत आहे. मात्र, या लढतीपूर्वीच टीम इंडियाचे सेमी फायनलमधले स्थान जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या सामन्यातील निकालाचा भारतीय संघावर काही परिणाम होणार नाही.

दुसरीकडे या स्पसर्धेतील सुरुवातीच्या. सलग दोन सामन्यावत झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. आजच्या या सामन्यात मोठा विजय मिळवण्याचा कांगारुंचा प्रयत्न असेल. जॉर्ज बेलीच्या टीमने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ केला तर धोनी ब्रिगेडला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.

टीम इंडियाकडून सलामीवीर शिखर धवन आणि युवराज सिंह फॉर्मात नाहीत. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली सातत्यपूर्ण चांगला खेळ करत आहेत. तर दुसरीकडे रवींद्र जाडेजा, आर. अश्विन आणि अमित मिश्रा हे फिरकी त्रिकूटाने या स्पर्धेतच दहशत निर्माण केली आहे. त्यांच्या फिरकीपुढे कोणचाच निभाव लागलेला नाही. त्यामुळे टीम इंडियाचा सामना करणे आव्हान असणार आहे.

Leave a Comment