पुणे, – ‘सलाम पुणे’च्या वतीने आयोजित करण्यात येणार्या यंदाच्या महाराष्ट्र दिन सोहळ्यात पुण्यातील गौरी गाडगीळ या एका अभिनेत्री आणि खेळाडू असलेल्या विशेष मुलीला-‘ सलाम पुणे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर आणि कार्याध्यक्ष संतोष चोरडिया यांनी दिली.
गाणी, नृत्य ,संगीत, हसवा हसवी यांच्या अनोख्या आविष्काराचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात उत्कृष्ट मालिका, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, नृत्य अभिनेत्री, विनोदी अभिनेता – अभिनेत्री, यासह विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेल्यांना ‘ सलाम पुणे ’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे . येत्या 1 मे रोजी संध्याकाळी साडेचार वाजता नवीपेठेतील एस .एम जोशी सभागृहात हा महाराष्ट्र दिन सोहळा खासदार संजय काकडे, दिग्दर्शक महेश लिमये, संगीतकार आदी रामचंद्र , पुणे निर्माता संघाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे .
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणार्या गौरी गाडगीळ या विशेष मुलीने ने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहणे आणि नृत्य कलेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत स्विमिंग मध्ये 2 वेळा रौप्य पदक मिळविले आहे . तिच्याच जिवनावर आधारित मयलो म हा चित्रपट अभिनेता रितेश देशमुख यांनी निर्माण केला आहे.