मुंबई – आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूका लक्षात घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चेहरा दाखवून मते मिळणार नाहीत, याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांनी आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा आधार घ्यावा लागत आहे. त्यांमुळे गेल्यात काही दिवसांपासून मनसेची घसरण सुरू आहे, असे टीकास्त्र भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोडले.
मनसे गेल्यास काही दिवसांपासून मोदीच्यार नावाने प्रचार करीत असलेली तक्रार भाजपच्या शिष्टत मंडळाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले असून त्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. निवडणुकीत कोणाचा चेहरा दाखवून मते मिळवायची, असा प्रश्न मनसेला पडलेला दिसतो. त्यामुळे त्यांनी मोदींच्या फोटोचा आधार घेतला, असा टोला मुंडे यांनी हाणला.
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन माजी आमदार साहेबराव दरेकर आणि भीमराव धोंडे या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बीड जिल्हयात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेली निवडणूक मुंडे यांना सोपी जाणार आहे.