आगामी काळात आयपीएल सामने होणारच

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांच्यावर कारवाई करीत आयपीएलमधील दोन संघावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात आयपीएलमधील सामने होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दरम्यान, बीसीसीआयसमोर सध्या संकटांचे डोंगर उभे असले तरीही यंदाची आयपीएल (२०१४) होणारच, अशी माहिती बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता आगमी काळात आयपीएल स्पर्धा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेन्नईत बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी तर दोन दिवसांपासूनच ठाण मांडले आहे. शनिवारी अन्य पदाधिकारी व श्रीनिवासन यांना जवळचे असलेले सदस्य ‘सिमेंट किंग’च्या प्रती असलेली विश्वासार्हता व निष्ठा अर्पण करण्याकरिता जमले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुचविलेल्या तीन सूचनांवर काय करायचे, याबाबत खल सुरू आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत यंदाची आयपीएल स्पर्धा घेण्याचा निर्धार सर्व सदस्यांनी केला आहे.

आगामी काळात आयपीएल स्पर्धा आठपेक्षा कमी संघांमध्येही आयोजित केली तर नुकसान होईल. मात्र, स्पर्धा आयोजिन न केल्यामुळे होऊ शकणारे नुकसान यापेक्षाही अधिक असेल, याची कल्पना सदस्यांना आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांना यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सहभागी न केल्यास सहाच संघ उरतील. दोन संघ कमी झाल्यामुळे स्पर्धेचे साखळीचे १४ सामने कमी होतील. ७६ ऐवजी ६२ सामनेच होतील. एकूण फायदाही कमी होईल. मात्र हे नुकसान कमी प्रमाणात असणार आहे. त्याेमुळे आता आगमी काळात आयपीएल स्पार्धा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.