विनायक मेटे अखेर महायुतीत दाखल

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या विनायक मेटे यांनी अखेर महायुतीच्या कळपात सहभागी झाले आहेत. याची घोषणा त्यांनी रंगशारदा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी महायुतीचे उद्धव ठाकरे, गोपिनाथ मुंडे, विनोद तावडे, रामदास आठवले उपस्थित होते. शिवसंग्राम संघटना लोकसभा निवडणूकीत महायुतीला सहकार्य करणार असल्याचे मेटे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे संधी शोधणा-या मेटे यांनी अखेर महायुतीच्या वळचळणीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत त्यांनी राष्ट्रवादीच्याच ज्येष्ठ नेत्यांवर टिका केली होती. त्याची पक्षाने गंभिर दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. मात्र त्याला उत्तर न देता त्यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेताला आहे. दरम्यान त्यांच्या प्रमाणेच राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक राजेश पिल्ले यांनीही आपल्या समर्थकांसह रंगशारदा येथेच भाजपमध्ये प्रेवश केला.

Leave a Comment