शक्ती मिल बलात्कारप्रकरणी सुनावणी एक एप्रिलला

मुंबई- शक्ती मिल परिसरात छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या खटल्याची पुढील सुनावणी एक एप्रिल रोजी होणार आहे.  आज (शुक्रवार) झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वेळ मागितला आहे. यामुळे न्यायालयाने याप्रकरणाची पुढील सुनावणी 1 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

कलम ‘376 ई’नुसार एखादा आरोपी वारंवार बलात्कारसारखा गंभीर गुन्हा करत असेल तर त्याला आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. यामुळे बलात्काराच्या खटल्यात फाशी किंवा जन्मठेपेची मागणी होणारा हा देशातील पहिलाच खटला आहे.  शक्ती मिलमध्ये झालेल्या बलात्काराच्या दोन्ही खटल्यांत दोषी ठरलेल्या आरोपी आरोपी विजय जाधव (19), कासीम बंगाली (28) व मोहम्मद सलीम अन्सारी (21) या तीन आरोपींवर कलम 376 (ई) नुसार आरोप निश्‍चित झाला आहे. या आरोपाच्या सिद्धतेसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती.

Leave a Comment