येरवडा जेल मध्ये रंगले थरार नाट्य

पुणे – पुण्याच्या मध्यवर्ती येरवडा कारागृहात सोमवारी सायंकाळी सुमारे दोन तास चांगलचा हंगामा झाला असल्याचे वृत्त आहे. दिवसभर कामासाठी बाहेर असलेल्या कैद्यांना सायंकाळी मोजणी करून सेल व बराकीत बंद केले जाते मात्र सोमवारी या सेल व बराकींच्या कुलपांच्या किल्लयाच हरविल्याने जेलमधील सुरक्षा रक्षकांची लापरवाही दिसून आली आहे. सुमारे दोन तासांच्या शोधाशोधीनंतर या किल्ल्या सापडल्या मात्र तोपर्यंत सर्व कैदी मोकळेच होते असेही समजते. या काळात जेलमधील अधिकारी मात्र श्वास रोखून बसले होते असेही सांगितले जात आहे.

या तुरूंगात अनेक खतरनाक कैदी आहेत. कसाबला येथेच फाशी झाली तर संजय दत्त येथेच शिक्षा भोगत आहे. सोमवारी सायंकाळी किल्ल्या हरविल्याने दोन तासांपर्यंत सर्व गेट, बरकी आणि लॉकअप उघड्या स्थितीतच होते असे येथील अधिकार्‍यांनी नांव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या काळात जेलमधील स्थिती भयानक होती. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या जेल गार्डचे नांव समजू शकलेले नाही. किल्ल्यांचा कसून शोध घेतल्यानंतर त्या जेलरजवळ असल्याचे समजले. अर्थात त्यांना या हरविलेल्या किल्या जेलपरिसरातूनच मिळाल्या असेही सांगितले जात आहे.

जेल सुपरिटेंडेंट योगेश देसाई यांनी याबाबत कांहीही बोलण्यास नकार दिला तर अन्य एका वरीष्ठ अधिकार्‍याने कामाचा बोजा खूप असल्याचे अशी चूक होऊ शकते असे स्पष्टीकरण दिले आहे. येरवडा कारागृहाचा परिसर सुमारे ५०० एकरांत पसरलेला असून येथे २६६ सेल व ४३ बराकी आहेत. १८७१ साली बांधल्या गेलेल्या या कारागृहात ३ हजार कैदी आहेत.

Leave a Comment