निस्सान जगभरातून ९.९०,००० गाड्या परत घेणार

जपानी कार उत्पादक कंपनी निस्सान ने त्यांच्या कार मॉडेलमध्ये आढळलेल्या दोषानंतर जगभरातून ९लाख ९० हजार वाहने परत घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या गाड्यांच्या फ्रंट पॅसेंजर साईड एअरबॅगमध्ये दोष आढळला आहे. या एअरबॅग अपघात झाला असता उघडत नाहीत परिणामी प्रवाशाचा जीव धोक्यात येण्याची भीती असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कंपनीने या एअरबॅग असलेल्या मॉडेल्सच्या कार परत घेण्याचे ठरविले आहे.

अर्थात उत्पादनातील दोषाबाबत कंपनीने सॉफ्टवेअरमध्ये गडबड असल्याने हा दोष निर्माण झाला असल्याचा खुलासा केला आहे.२०१३-१४ या वर्षातील मॉडेल्समध्ये हा दोष आहे. तीन अपघात प्रकरणात कार क्रॅश झाल्यानंतरही या एअरबँग उघडल्या नसल्याचे आढळले आहे. परत घेण्यात येणार्‍या गाड्यात ५ लाख ४४ हजार अल्टीमा, १ लाख २४ हजार एसयूव्ही, १ लाख ८३ हजार सेन्टा कॉम्पॅक्ट, २९ हजार लीफ इलेक्ट्रीक व्हेईकल्स तर ६,७०० एन व्ही २०० टॅक्सींचा समावेश आहे.

Leave a Comment