झोपेबाबत जागरूक रहा

आपल्या शरीरातल्या चयापचय क्रियांमध्ये आहार, व्यायाम यांना तर महत्व आहेच, परंतु झोपेला सर्वात जास्त महत्व आहे. आपल्या शरीराची कामे करण्याने झीज होते आणि आपली शक्ती खर्च होते. थोडे वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या शरीराचे चलनवलन सांभाळणार्‍या बॅटरीचे चार्जिंग कमी होते. तिला पुन्हा चार्ज करण्यासाठी आपल्याला झोप आवश्यक असते. झोप नसेल तर बॅटरी चार्ज होणार नाही. त्यामुळे डॉक्टर मंडळी सध्या झोपेच्या बाबतीत ङ्गारच मोठे संंशोधन करायला लागले आहेत. झोप कमी झाल्यास माणूस खूप थकतो, त्याची ऊर्जा कमी झालेली असते, म्हणावे तेवढे काम होत नाही आणि म्हणावे तसेही होत नाही. असे झोपेच्या अभावाचे अनेक परिणाम आहेत. असेच परिणाम आणखी एका गोष्टीने होतात, ती गोष्ट म्हणजे तणाव. तणाव हा मनात निर्माण होतो आणि तो मनाला बेचैन करतो. परंतु त्याचे सारे दुष्परिणाम शरीरावर होतात. तणावा-मुळे कामाचा माणूस वाया जातो. त्यामुळे तणाव हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. या शत्रूमुळे आपल्या शरीरात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सार्‍या गोष्टी झोपेच्या अभावामुळेही घडतात. म्हणजे तणावाने शरीराचे जसे आणि जेवढे नुकसान होते तसेच तेवढेच नुकसान झोप कमी मिळाल्यामुळे होत असते.  

नेदरलँडस् आणि ब्रिटनमधील संशोधकांनी १५ निरोगी तरुण व्यक्तींचे या संबंधात सूक्ष्म निरीक्षण केले. त्यांना भरपूर झोप मिळाल्याच्या अवस्थेत त्यांच्या रक्ताची अवस्था काय होती आणि त्यांना झोप मिळाल्यानंतर ती अवस्था काय होती याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. तेव्हा असे आढळले की, झोप कमी मिळाल्यास त्यांच्या पांढर्‍या रक्तपेशींमध्ये काही बदल झालेले आहेत. त्यांची संख्या वाढलेली आढळली. रात्र आणि दिवस यांचे मानवी शरीरावर काही आवर्तनात्मक परिणाम असतात. 

हिृदम् या आवर्तनामध्ये बदल झाला की, माणसाच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतात. शरीरामध्ये झालेले हे परिणाम आणि तणाव वाढल्यानंतर होणारे परिणाम सारखेच असल्याचे दिसून आले. पूर्वीच्या काळी झोपेच्या बाबतीत करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून आले होते की, झोप कमी झाल्यास जाडी वाढणे, मधुमेह आणि रक्तदाब हे विकार वाढत असतात. या निष्कर्षाची संगती लावताना डॉक्टरांनी असे दाखवून दिले होते की, माणसाला झोप कमी मिळाली की त्याचे रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि ती कमी झाली की त्याला हे विकार जडतात. म्हणजे झोप कमी होण्याच्या प्रक्रियेचे हे शारीरिक विश्‍लेषण होते. परंतु आता मात्र शास्त्रज्ञांनी झोप कमी होण्याचे मानसिक विश्‍लेषण केले आहे आणि झोप कमी होण्याने मनावरचा तणाव वाढतो आणि तो वाढल्यामुळे विशेषत: हे मनोकायिक विकार होत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment