औरंगाबादमधून करणार काँग्रेसचे उत्तमसिंग पवार बंड

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शेवटच्याब क्षणी काँग्रेसने माजी आमादार नितीन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने गेल्याा वेळेसचे पराभूत उमेदवार उत्तेमसिंग पवार यांना तिकीट दिले नाही. त्यांचे येथील तिकीट कापल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांमुळेच त्यांनी आता बंडखोरी करीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय काँग्रेसकडून भ्रष्टाचा-यांना उमेदवारी मिळत असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.

काँग्रेसनं ब-याच उशिरापर्यंत औरंगाबादमधून उमेदवारी जाहीर केली नव्हती. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची वेळ काँग्रेसवर येते की अशी शंका निर्माण झाली. अखेर काँग्रेसन नितीन पाटलांच्या नावार शिक्कमोर्तब केला. त्याशमुळे उत्तरमसिंग पवार उमेदवारी न मिळाल्यांने नाराज झाले आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उत्तमसिंग पवार यांच्या अपक्ष उमेदवारीनं मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील खासदार चंद्रकांत खैरे यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे. त्या.मुळे आगामी काळात काँग्रेस याचा कसा सामना करते हे पाहणे हे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment