माझी तब्येत उत्तम -लता मंगेशकर

मुंबई –  माझी तब्येत उत्तम आहे असे गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांच्या ट्विटर अकौंटवर ट्विट केले आहे. बुजुर्ग अभिनेत्री बेबी नंदा यांच्या मृत्यूपाठोपाठच गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी वार्‍याच्या वेगाने पसरल्याने कांही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे लता मंगेशकर यांनी हा खुलासा केला आहे.

तब्येतीबाबत पसरलेल्या अफवांचा इन्कार करताना लताजी ट्विट करतात, मेरी तबीयत के बारेमें अफवाएँ फैल रही हैं. पर आप सब का प्यार और दुलार हैं की मेरी तबियत बिल्कुल ठीक हैं.