सुनील गावस्करांना बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष बनवा

नवी दिल्लीभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना पायउतार होण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावरही कोणतीही कारवाई करणार्‍या बीसीआयला न्यायालयाने आज गुरुवारी (दि.२७) अखेर दणका दिला. आयपीएलमधील भ्रष्टाचार प्रकरणी नेमण्यात आलेल्या मुदगल समितीने केलेल्या शिफारशींनुसार कारवाई केली जाईल, असे बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयानेही आता या प्रकरणी कठोर भूमिका घेत चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी आयपीएलमध्ये खेळू नये, असा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबरोबरच, ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष व्हावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. श्रीनिवासन वा इंडिया सिमेंट् या कंपनीशी संबंधित कोणतीही व्यक्ती बीसीसीआयच्या कारभाराशी संबंधित असता कामा नये, असेही न्यायालयाने यावेळी सांगितले.

 आयपीएलमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आपला अंतरिम निर्णय न्यायालय उद्या शुक्रवारी (दि.२८) सुनावणार आहे. तोपर्यंत या प्रस्तावांसंदर्भात बीसीसीआयने आपली भूमिका जाहीर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) या स्पर्धेमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी श्रीनिवासन हे अध्यक्ष असताना नि:पक्षपातीपणाने होणार नाही. यामुळे श्रीनिवासन यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडावे,’ असा इशारा न्यायालयाने दिला होता. मात्र, श्रीनिवासन हे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदविलेल्या निरीक्षणाचा आपल्या कायदेशीर सल्लागारांच्या मदतीने सखोल अभ्यास करुन अंतिम निर्णय घेतील, असे बीसीसीआयने सांगितले. बीसीसीआय उपाध्यक्ष शिवलाल यादव यांनी यासंदर्भातील माहिती दिली. श्रीनिवासन हे राजीनामा देणार नाहीतच, असे नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करूनच यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येईल,’’ असे यादव म्हणाले.

बीसीसीआय श्रीनिवासन हे अद्याप यासंदर्भातील कायदेशीर पर्यायाचा विचार करत असल्याचे मानले जात आहे. श्रीनिवासन हे राजीनामा देण्यास तयार नसल्याचे काही बीसीसीआय अधिकार्‍यांनी सांगितलेदरम्यान, बीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील सर्व सामन्यांची चौकशी केली जावी या वर्षीची आयपीएल स्पर्धा रद्द केली जावी, असेही मनोहर यांनी म्हटले आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी अंतरिम आदेश देणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर अंतिम निकाल येईपर्यंत एन.श्रीनिवासन यांच्या जागी सुनील गावस्कर यांची बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तसेच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांनी आयपीएलसात मध्ये सहभागी होऊ नये असा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने दिला. इंडिया सिमेंटशी संबंधित कुठल्याही व्यक्तीने बीसीसीआयमध्ये राहू नये असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या मतांवर बीसीसाआयकडून उद्यापर्यंत उत्तर मागितले आहे. त्याआधी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना पदावरुन पायउतार होण्याचा इशारा दिला होता. त्यावर बीसीसीआयने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश मुकूल मुदगल समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव दिला.

अहवालात ज्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे त्यांच्यावर कारवाई करु असे बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटच्या भल्यासाठी आम्हाला कठोर विचार करुन तसे आदेश द्यावे लागतील असे सांगितले. एन.श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असेपर्यंत आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही त्यामुळे श्रीनिवासन पदावरुन पायउतार व्हा, नाही तर तसे आदेश द्यावे लागेल असा सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला होता.