सर्दीचा व्हायरस ठरला उपयुक्त

सध्या जगातले हजारो डॉक्टर आणि संशोधक कर्करोगावर काय काय उपाय शोधता येतील याचा, ध्यास घेतल्यासारखा शोध घेत आहेत. त्यांना कोणत्या वेळी कशामध्ये कर्करोगाचे औषध सापडेल याचा काही नेम सांगता येत नाही. उदाहरणार्थ आता ब्रिटनमधील लिडस् विद्यापीठाच्या संशोधकांना कर्क-रोगावर एक वेगळेच औषध सापडले आहे. या विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑङ्ग कॅन्सर रिसर्च या संस्थेतील संशोधकांना सर्दी होण्यास कारणीभूत ठरणारा व्हायरस कर्करोगावरील इलाज म्हणून उपयुक्त ठरू शकेल, असा साक्षात्कार झाला आहे. कर्करोगावर इलाज शोधण्याच्या कामामध्ये हा साक्षात्कार म्हणजे ङ्गार मोठे यश मानले जात आहे. सर्दी होण्यास जो व्हायरस कारणीभूत ठरतो तो व्हायरस ट्यूमरचा नाश करण्यास आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासही गुणकारी ठरू शकतो. मात्र हा व्हायरस गोळा करून त्याचे इंजेक्शन तयार करून ते रुग्णाच्या रक्तप्रवाहात सोडले पाहिजे. असे केल्याने काय होते हे थोडेसे शास्त्रीय भाषेत समजून घेतले पाहिजे. 

रक्तामध्ये काही जंतू आणि जैविक घटक असतात. असे काही घटक कॅन्सर ङ्गायटिंग घटक म्हणून ओळखले जातात. हे घटक रक्तात असतात म्हणून आपले शरीर विविध प्रकारच्या कर्करोगांचा मुकाबला करू शकत असते. आपल्या शरीरामध्ये अनेक परस्परविरोधी प्रक्रिया सुरू असतात. त्या प्रक्रियांमध्ये काही प्रक्रिया या कॅन्सर ङ्गायटिंग घटकांना मजबूत करत असतात तर काही प्रक्रिया या घटकांना क्षीण करत असतात. त्यांना क्षीण करणारे घटक कमी करणे आणि त्यांना मजबूत करणारे घटक बळकट करणे हे आवश्यक असते. तरच रुग्ण कर्करोगाचा प्रतिकार करू शकतो. आता सर्दी होण्यास कारणीभूत ठरणारे व्हायरस नेमके काय करतात हे समजून घेतले की, हे नवे संशोधन काय आहे हे कळते. हे सर्दीचे व्हायरस शरीराच्या रक्तप्रवाहात सोडले जाते. या रक्तामध्ये कॅन्सर ङ्गायटिंग घटकांना क्षीण करणारे जे घटक आहेत त्यांची शक्ती कमी करते. 

थोडक्यात सर्दीचे व्हायरस रक्तातल्या कर्करोगांच्या शत्रूंचे बळ कमी करतात. इन्स्टिट्यूट ऑङ्ग कॅन्सर रिसर्च या संस्थेमध्ये दहा कर्क रुग्णांवर या व्हायरसचा उपचार करण्यात आला. तेव्हा असे लक्षात आले की, रक्तामध्ये सोडलेले हे व्हायरस कॅन्सरच्या जंतूंचा नाश करतात आणि कॅन्सरच्या जंतूंचा नाश करणार्‍या अन्य जंतूंना मजबूत करतात आणि एकंदरीत कॅन्सरशी मुकाबला करण्याची प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करतात. असा हा उपयुक्त व्हायरस रिओ व्हायरस या नावाने ओळखले जातात. या निष्कर्षामुळे कर्करोगावर प्रभावी उपचार शोधण्याच्या आपल्या कार्यामध्ये मोठेच यश मिळाले असल्याचे मत या संस्थेचे प्रमुख डॉ. केविन हॅरिग्टन यांनी व्यक्त केले. सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीन या नियतकालिकात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही