सचिन करणार आता आयपीएलचे प्रमोशन

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झालेला असला तरी त्या ला अजून क्रिकेटपासून दूर राहता येत नाही. त्यामुळेच आगामी काळात सचिनने इंडियन प्रिमीअर लीगच्या सातव्या सीझनचे प्रमोशन करताना दिसणार आहे. त्यामुळे या सीझनमध्ये सचिन खेळत नसला तरी तो प्रमोशनच्या माध्यामातून आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे.

आतापर्यंत मुंबई इंडियन्सतर्फे खेळणारा सचिन आतापर्यंत आपल्याच संघाला प्रमोट करत होता. पण आता तो आयपीएलला प्रमोट करणार आहे. बीसीसीआयच्या या लीगच्या नव्या प्रोमोमध्ये सचिन मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ‘सचिन तेंडुलकर स्टँड’मध्ये बसलेला दिसत आहे. त्या मुळे प्रेक्षकांचा उत्सह हा दिगुणीत होणार आहे.

आयपीएलच्या सहा सीझनमध्ये सचिन तेंडूलकरने दमदार फलंदाजी करती असताना एकूण ७८ सामने खेळली त्यामध्ये १ शतक आणि १३ अर्धशतकांसह सचिनने २ हजार ३३४ धावा केल्या आहेत. त्याची ही दमदार खेळी आजही प्रेक्षकाना आठवणीत राहते.

Leave a Comment