विराटच मोडेल सचिनचे विक्रम- कपीलदेव

क्वालालंपूर – प्रत्येक सामन्यागणीक टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहली याचा खेळ बहरत चालला आहे. त्यामुळे त्या‍च्याकडून अपेक्षा वाढत चालल्या आहेत. टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज विराट कोहली जर प्रदीर्घ काळ दुखापतीविना खेळू शकला तर फलंदाजीतील सचिनसह अनेकांचे विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असे मत भारताचा माजी कर्णधार कपिलदेव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

यावेळी पुढे बोलताना कपील देव म्हणाला की, फलंदाजीत दमदार कामगिरी करीत डॉन ब्रॅडमन किंवा सचिन तेंडुलकर होणे त्याला शक्य नाही. तरी सचिनचे फलंदाजीतील काही विक्रम विराट हा मोडू शकतो, असा विश्वास कपिलने नमूद केला आहे. २४ वर्षांच्या विराटकडे प्रचंड प्रतिभा दिसणे दुर्मिळ असते. त्यामुळेच तो कदाचित सचिनचेही अनेक विक्रम मोडू शकेल.

आागमी काळात हात असलेले आयपीएल सामने भारताऐवजी अरब अमिरातमध्ये खेळवणे हे निश्चितच फायद्याचे ठरणार आहे. विविध देशांमध्ये आगामी काळात आयपीएल सामने खेळवले गेल्यास त्या देशांमध्येही क्रिकेटच्या प्रसारास मोठय़ा प्रमाणात मदतच मिळणार आहे, असेही कपीलदेव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment