पॅनासोनिकचा नवा एचएक्स ए-५०० वेअररेबल कॅमेरा

पॅनासोनिक कंपनीने जगातला पहिला वेअरेबल कॅमेरा बाजारात आणला आहे. एचएक्स ए-५०० या नावाने हा कॅमकॉर्डर बाजारात आणला गेला आहे. हा स्ट्रॅप ऑन कॅमकॉर्डर कॅमेरा प्रतिसेकंद २५ फ्रेम या वेगाने ४ हजार रेझोल्युशनचे फोटो काढू शकतो. स्लो मोशनमध्ये हा कॅमेरा सेकंदाला ५० ते १०० फ्रेम काढू शकतो.

दोन पीसमध्ये असलेला हा कॅमेरा जगातील पहिला हलका, स्ट्रॅपऑन कॅम कॉर्डर कॅमेरा असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे दोन्ही पीस केबलने जोडलेले आहेत. आणि शरीरावर कुठेही घालता येईल असे कंट्रोल युनिट त्याला आहे. हे दोन्ही पीस वेगळे ठेवूनही कॅमेर्‍यावर काम करता येते. हा स्मार्टफोनशी कनेक्ट करता येतो तसेच याच्या स्क्रीनचा व्हयू फायंडर म्हणूनही वापर करता येतो. हा वॉटरप्रूफ कॅमेरा आहे. तीस मिनीटांपर्यंत ३ मीटर पाण्यात तो ठेवला गेला तरी खराब होत नाही.

कंपनीने हा कॅमेरा युरोपच्या बाजारात मे मध्ये सादर होत असल्याचे जाहीर केले असून त्याची किंमत आहे ४२९ युरो म्हणजे साधारण ३५,९४० रूपये.

Leave a Comment