उमेदवारी दाखल करण्यासाठी लगबग

मुंबई- महाराष्ट्रातून दुस-या टप्पायात होत असलेल्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्‍याची लगबग उमेदवाराकडून सुरू आहे. दुपारी तीन वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. त्यामुळे सर्वच पक्षात उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ सुरू आहे.

मंगळवारी उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसचे नांदेडमधील उमेदवार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचे पुण्यातल्या चारही मतदार संघातील उमेदवार एकाच वेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पिंपरी-चिंचवडचे आपचे उमेदवार मारुती भापकर तर राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर तिकडे शिर्डीत शिवसेनेनी बबनराव घोलप यांच्या ऐवजी सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर केली आहे. ते देखील बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील बुधवारी विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Leave a Comment