शिवसेना-मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरुच

मुंबई – शिवसेना-भाजप-रिपाइं यांच्या महायुतीत मनसेने सहभागी व्हारवे यासाठी भाजपने खूप प्रयत्नि केले. त्यानंतरही मनसे महायुतीत सहभागी झाली नाही. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीत दोन्ही पक्षाचे नुकसान होणार आहे. त्यामुळेच आता दोन्ही पक्षांतील दुस-या फळीतील नेते सरसावले आहेत. मनसे महायुतीचा एक भाग बनावा यासाठी शिवसेना आणि मनसेचे नेते प्रयत्नशील आहेत. दोन्ही पक्ष आमनेसामने आल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत सेनेला फटका बसणार असला तरी भविष्यात विधानसभेत मनसेलाही फटका बसणार आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मन वळवण्याचे अजूनही प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

लोकसभा निवडणूकीसाठीच मनसे महायुतीत यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न झाले होते. मात्र उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनाही तसे वाटत नसल्याने भाजपचे मनोमिलनाचे प्रयत्न फसले. मात्र जवळपास महिनाभर आधी राज ठाकरे यांचे निवासस्थान ज्या लोकसभा मतदारसंघात आहे तो दक्षिण मध्य मुंबई, मनसेचे तीन आमदार ज्या मतदारसंघात आहेत, तो ईशान्य मुंबई याशिवाय नाशिक, पुणे आणि आणखी दोन-तीन जागा अशा जवळपास पाच ते सहा जागा मनसेच्या पदरात पडाव्यात, असे मनसेच्या दुस-या फळीतील नेत्यांना वाटत होते.

त्याचवेळी तशाप्रकारची प्राथमिक बोलणी शिवसेनेतील दुस-या फळीतील नेत्यांसोबत केली होती. मात्र त्याला दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. लोकसभेला आमची अडचण झाली असली तरी पुन्हा विधानसभेला तुमचीही अडचण होणार असल्याबाबत दोन्ही पक्षांतील दुस-या फळीतील नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे अजूनही वेळ न दवडता दोन्हीकडे मान्य होईल, असा प्रस्ताव तयार करून त्यावर दोन्ही नेत्यांचे मन वळवण्यासाठी दुस-या फळीतील नेते प्रयत्नल करीत असल्यााचे समजते.

Leave a Comment