विसराळूपणा तुमचा नव्हे तर जनुकाचा दोष

विसराळूपणाचे अनेक किस्से आपण ऐकत असतो आणि जे विसराळू आहेत त्यांना बाकीच्यांकडून सतत टिंगल टवाळी आणि टोमण्यांना सामोरे जाण्याची पाळी येत असते. मात्र विसराळू लोकांसाठी आता आनंदाची खबर अशी की विसराळूपणा हा त्यांचा दोष नाही तर विसराळूपणासाठी दोषी आहे मेंदूतील एक जनुक. आणि कोणती जनुके आपल्या शरीरात असावीत याचा चॉईस आपल्याला कुठे असतो?

जर्मनीच्या बॉन विद्यापीठातील मानसतज्ञांनी असा जनुक शोधून काढला आहे की जो विसराळूपणासाठी कारणीभूत आहे. या जनुकामुळेच विसरभोळे लोक दररोज किल्ल्या, मोबाईल, चष्मा, छत्र्या, कारच्या चाव्या, अशा रोजच्या वापरातील वस्तूही कुठे ठेवल्या ते विसरतात अथवा दुसरीकडे गेले तर तेथे विसरून येतात. या जनुकाचे डी टू रिसेप्टर असे नांव आहे. हा डोक्याच्या पुढच्या भागातून सिग्नल पाठविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा जनुक अस्थिर असतो त्यांच्यात विसराळूपणा अधिक असतो असे या तज्ञांचे म्हणणे आहे. 

त्यामुळे आता विसरभोळेपणामुळे शर्मिंदे होऊ नका कारण त्यात तुमचा कांही दोष नाही. दोष द्यायचाच असेल तर तो डी-टू ला द्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment