पाळ्यांत काम करण्याचे परिणाम

अनेक कामगारांना निरनिराळ्या पाळ्यांत काम करावे लागते.  त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणामही होत असतो पण या परिणामांचा म्हणावा असा सखोल अभ्यास आजवर झाला नव्हता. साधारणत: अशा पाळ्यांत कामे करणार्‍या कामगारांना पित्ताचा त्रास होत असतो. काहींना रात्रीच्या जागरणाची भरपाई होण्यासाठी दिवसा झोप मिळाली नाही तर त्यांच्या डोळ्यांवर आणि डोक्यावरही परिणाम होत असतो ही गोष्ट सामान्य मानली जात असते पण या पाळ्यातल्या कामांचा आणि त्यातून निर्माण होणार्‍या अनियमित आयुष्याचा या पलीकडे जाऊन काही परिणाम होत असेल तर तोही पडताळून पहावा असा प्रयत्न कोणी केला नव्हता. जेव्हा तो केला गेला तेव्हा धक्कादायक निष्कर्ष हाती लागले. निरनिराळ्या पाळ्यांत काम करण्याचे परिणाम यापलीकडे असून त्यातून हृदयविकार आणि अन्य काही स्नायूंचे विकार निर्माण होत असतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. ही पाहणी करणार्‍या तज्ञांनी ती सर्वात मोठी पाहणी असल्याचा दावा केला असून या पाहणीत सार्वजनिक  आरोग्य आणि व्यवसायाधिष्ठित उपचार यांच्याशी निगडित असलेल्या शास्त्रावर मोठा परिणाम होईल असाही दावा केला आहे. 

या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी एवढी सविस्तर माहिती आजवर कधीही उपलब्ध झालेली नव्हती असे त्यांनी म्हटले आहे खरे तर निरनिराळ्या पाळ्यांत काम करणार्‍या कामगारांची अशी पाहणी  पूर्वीच करायला हवी होती. कारण आपल्या जीवनात नियमिततेला ङ्गार महत्त्व असते. ज्याचा दिनक्रम ठरल्याप्रमाणे पार पडत असतो त्याच्या आरोग्याला कसलाही धोका नसतो. कारण आपल्या शरीराचे एक बॉडी क्लॉक असते. ते विचलित झाले की आपल्या आरोग्यात बिघाड होत असतो. आरोग्याच्या बाबतीत या बॉडी क्लॉकला सर्वात अधिक महत्त्व असते. पण शिफ्ट मध्ये काम करणारांना आपला दिनक्रम दर आठवड्याला बदलावा लागतो म्हणून तो बदल त्यांच्या आरोग्याला मोठे आव्हान ठरत असतो. 

बॉडी क्लॉक विचलित झाल्याचा सर्वात पहिला परिणाम उच्च रक्तदाबावर होतो. नंतर हळुहळू  कोलेस्टेरॉल वाढायला लागते. मधुमेह सोबत करायला येतो आणि मग हृदयविकाराकडे वाटचाल सुरू होते.  असे गंभीर परिणाम असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ३४ ठिकाणी अशा कामगारांची पाहणी करण्यात आली. त्यात वीस लाख कामगारांचा  समावेश करण्यात आला होता. शिफ्ट वर्क अँड व्हॅस्कुलार डिसीजेस असा या पाहणीचा विषय होता. ही पाहणी करताना पाळ्यांत काम न करणारे कामगार आणि पाळ्यांत कामे करणारे कामगार असे दोन भाग पाडण्यात आले होते. शिवाय पाळ्यांत काम करणार्‍या कामगारांचेही त्यांच्या पाळ्यांच्या बदलत्या वेळानुसार गट करण्यात आले होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment